नाशिक: राज्य उत्पादन शुल्कचे गोडावून फोडून लाखोंचा मद्यसाठा लंपास

नाशिक: राज्य उत्पादन शुल्कचे गोडावून फोडून लाखोंचा मद्यसाठा लंपास

नाशिक (प्रतिनिधी): पेठ रोडवरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोडाऊनमध्ये जप्‍त करून ठेवलेला साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गांत रविवारी (दि. २९) महत्वाचे बदल…

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पेठ रोडवरील आदिवासी कॉलनी येथे असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ बिल्डिंग नंबर 1 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गोडाऊन आहे.

छापेमारीत बेकायदा वाहतूक, निर्मिती, आणि विक्रीत आढळून आलेला मद्यसाठा या ठिकाणी ठेवला जातो. दि. 21 ते 27 ऑक्टोबरदरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनमध्ये प्रवेश केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘उल्लास नवभारत साक्षरता अभियान’ अंतर्गत जिल्ह्यात फ्लॅन्ट परीक्षेचे आज (दि. २९) आयोजन

या चोरट्यांनी गोडाऊनमध्ये असलेले ओल्ड बिल एक्ट्रा स्पेशल व्हिस्कीचे प्रत्येक बॉक्समध्ये 12 बॉटल असलेले सुमारे 65 बॉक्स असा सुमारे 4 लाख 68 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल दि. 21 ते 27 ऑक्टोबरदरम्यान चोरून नेला. ही बाब जयराम श्रावण जाखेरे (रा. जॉकीनगर, नांदूर नाका, नाशिक) यांच्या लक्षात आल्यानंतर काल त्यांनी याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गोडाऊन फोडीची फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790