नाशिक: मधमाशांचे मोहोळ काढणे बेतले जीवावर; १२ वर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक: मधमाशांचे मोहोळ काढणे बेतले जीवावर; १२ वर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): मधमाशांचे मोहोळ काढण्याचा मोह अंगलट येऊन एका १२ वर्षीय बालकाचा ४० फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे…

मॅजिक बॉल गिळल्याने नाशकातील दीड वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येवल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मधाचे मोहोळ काढण्याचा मोह एका 12 वर्षीय बालकाच्या जीवावर बेतल्याने त्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.

येवल्याच्या येवल्याच्या सुरेगाव येथे ही घटना घडली. ऋषिकेश चव्हान, असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसर सुन्न झाला आहे.

मधाचा मोहोळ काढणे एका 12 वर्षीय बालकाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना येवल्याच्या सुरेगाव येथे घडली. शेतात असलेले मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश चव्हान गेला होता. मात्र, त्याच्यामागे मधमाशा लागल्यामुळे तो पळत जात असताना विहिरीत पडला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. बराच वेळ होऊन देखील ऋषिकेश घरी न आल्यामुळे त्याचा शोध घेण्यात आला असता विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सुरेगावावरून शोककळा पसरली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790