नाशिक: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Jobs in Nashik: Require Telecaller (Female) in Nashik. Click Here For More Details.

नाशिक: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक (प्रतिनिधी): भरधाव ओम्नी कारच्या चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना नांदूर लिंक रोड येथे घडली.

हे ही वाचा:  लाडक्या बहिणींचा देय हप्ता कधी जमा होणार ? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले..

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी रोशन भरत खेलूकर (रा. जागृतीनगर, पंचक, जेलरोड) यांचे वडील भरत यशवंत खेलूकर (वय 56) हे एमएच 15 एफडब्ल्यू 7499 या क्रमांकाच्या मोटारसायकलीने नांदूर लिंक रोडने जात होते.

हे ही वाचा:  नाशिक: सातपूर MIDCमध्ये कंपनीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी

त्यावेळी जवळच असलेल्या शेवंता लॉन्समधून बाहेर पडणार्‍या एमएच 14 सीके 5245 या क्रमांकाच्या ओम्नी कारचालक मनोज रमेश दहितुले (रा. राजूर, ता. अकोले, जि. अहमदनगर) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अचानक नांदूर नाक्याकडे वळण घेऊन खेलूकर यांच्या मोटारसायकलीस ठोस मारली.

हे ही वाचा:  नाशिक: पुढील पाच दिवस राज्यातील तापमानात होणार अंशतः वाढ

यात खेलूकर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790