Ad: तुमच्या व्यवसायाची जाहिरात पोस्ट करा नाशिक कॉलिंगवर…
नाशिक (प्रतिनिधी): उंटवाडीतील जगतापनगर भागात आईस्क्रिम घेण्यासाठी गेलेल्या चार वर्षीय बालिकेचा शॉक लागून मृत्यू झाल्याप्रकरणी दुकानमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या १ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती.
प्रसन्न चंद्रशेखर सोनार (२१ रा.सावतानगर,सिडको) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे.
पालकांच्या तक्रारीवरून याप्रकरणी मेडिकल स्टोअर चालकाविरोधात अंबड पोलिस ठाण्यात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- नाशिक: ट्रकला दुचाकीने मागून दिलेल्या धडकेत ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- नाशिक: तपोवनात 13 वाहनांच्या काचा फोडल्या; दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
- नाशिकच्या पंचवटी भाजी मार्केटमध्ये व्यापार्यावर प्राणघातक हल्ला
- नाशिक: मालकाचा विश्वासघात सराफी दुकानातून नोकराने चोरले 14 तोळे सोन्याचे दागिने
याप्रकरणी विशाल कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनार यांचे जगतापनगर येथील मातोश्री चौकात फस्ट केअर फार्मा नावाचे मेडिकल स्टोअर्स आहे. या दुकानात कुलकर्णी १ सप्टेंबर रोजी रात्री मुलगी ग्रीष्मा (वय ४ रा. सुखशांती बंगला,मातोश्री चौक) हिस सोबत घेवून आईस्क्रिम खरेदीसाठी गेले असता ही घटना घडली होती. आडव्या फ्रिजर जवळ उभी राहून ग्रीष्मा आईस्क्रीम डोकाऊन पाहत असतांना तिला इलेक्ट्रीकचा शॉक लागला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रथम आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तपासाअंती सदोष डिप फ्रिज ठेवल्याचा आरोप करण्यात आल्याने आता सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.