नाशिक: बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारायला गेलेल्या भावावर टोळक्याचा कोयत्याने हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): पुण्यानंतर अहमदनगरमध्ये देखील कोयता गँगचं लोण पसरल्याचं पहायला मिळाले. मात्र, यानंतर आता पुणे, अहमदनगरसोबत नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे. नाशिकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

बहिणीची छेड का काढली याचा जाब विचारायला गेलेल्या भावास संशयिताने दोघा भावा-बहिणीला जीवे मारण्याची धमकी देत, धारदार कोयत्याने डोक्यात, पोटावर, उजव्या पायावर तसेच पार्श्वभागावर वार केले.

तसेच पिडीत तरुणी तिच्या भावाला सोडविण्यासाठी गेल्यामुळे तिच्याही उव्या हातावर तसेच डोक्यावर कोयत्याने वार करून भाऊ व बहिण दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

ही धक्कादायक घटना अंबड लिंकरोडवर घडली असून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाची बहिण रविवारी सायंकाळी बुरकुले हॉल, सिडको येथून पायी घरी जात असतांना संशयित विशाल देवरे याने तिची छेड काढून शिवीगाळ केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 30 ऑक्टोबरला आयोजन

त्यामुळे पिडीत मुलीने घरी येऊन तिच्या भावाला घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे तिचा भाऊ हा संशयित विशाल देवरे यास जाब विचारण्यासाठी खंडोबा मंदिराजवळ मोरवाडी येथे गेला. त्यावेळी विशाल देवरे याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आणि त्याचे मित्र निलेश अहिरे, गौरव पेनमहाले, अनिकेत हुले, सुधीर अहिरे, सोनू लिहिणार यांनी मुलीच्या भावाला पकडून ठेवले. तर विशाल देवरे याने त्याच्या जवळील धारदार कोयता काढून त्याच्या डोक्यात, पोटावर, उजव्या पायावर आणि पार्श्व भागावर वार केले. यावेळी त्याची बहिण सोडविण्यासाठी गेली असता हल्लेखोरांनी तिच्याही उजव्या हातावर तसेच डोक्यावर कोयत्याने वार केले आणि दोघांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: 0084/2023).

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

नाशिकमध्ये सध्या सुरु असलेली ही गुंडगिरी आणि भाईगिरी कधी आटोक्यात येणार, असा संतप्त सवाल आता नाशिककर करत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790