नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात होर्डिंग लावण्यासाठी रविवार (ता. १९) पासून पोलिस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. विनापरवानगी क्रमांक होर्डिंग लावणाऱ्यांवर कमीत- कमी चार महिने, तर जास्तीत- जास्त १ वर्ष सशुल्क दंडाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आदेश काढले आहे.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त होर्डिंग लावून त्यात राजकीय वादंग टाळण्यासाठी निवडणुकांपर्यंत हा आदेश पोलिसांनी जारी केला आहे. रविवार (ता.१९) पासून याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त पांडे यांनी दिले. महापालिकेकडून परवानगी पत्र आयुक्त कार्यालयात आल्यानंतर त्यावर प्रसिद्ध होणारा मजकूर तपासूनच परवानगी क्रमांक दिला जाणार आहे.
आगामी नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी, नवीन वर्ष, महापालिका निवडणूक आदी सर्व कार्यक्रम लक्षात घेऊन राजकीय, सामाजिक, तसेच विविध कंपन्यांकडून नागरिकांना, मतदारांना अनेक प्रलोभने दाखवली जातात, त्याला ब’ळी पडून अनेकांचे नुकसान होत असते.
१२९ जागा निश्चित:
महापालिकेने ठरवून दिलेल्या १२९ अधिकृत जागांवरच होर्डिंग लावण्यापूर्वी पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे. शहराला शिस्तबद्ध पद्धतीने होर्डिंगमुक्त करणे, हा उद्देश पोलिस आयुक्त पांडेय यांचा आहे. होर्डिंग राजकीय, सामाजिक, जाहिरात स्वरूपात असले तरी संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
अनधिकृत ठिकाणी श्रद्धांजली, धा’र्मि’क, तसेच जा’ती’य ते’ढ निर्माण करणारे होर्डिंग थेट जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे, शिवाय त्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्यासोबत या होर्डिंग परवानगी संदर्भात चर्चा झाली असून महापालिका प्रशासन देखील सहकार्य करणार आहे. दरम्यान, आधीपासून लावलेले होर्डिंग नव्याने लावण्यासाठी २० दिवसांची मुभा देण्यात आलेली असून, ८ ऑक्टोबरपर्यंत त्यांनी ते होर्डिंग परवानगी घेऊन नव्याने लावावे लागणार आहे.