पालकांनो सावधान! नाशिकमध्ये चार वर्षाच्या चिमुकलीला थेट घरातून पळवून नेण्याचा प्रयत्न…

पालकांनो सावधान! नाशिकमध्ये चार वर्षाच्या चिमुकलीला थेट घरातून पळवून नेण्याचा प्रयत्न…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या शरणपूररोड भागात घरात झोपलेल्या चार वर्षीय चिमुरडीस एकाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला, पण शेजा-यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा डाव फसला.

शेजारच्यांना संशय आल्यामुळे त्यांनी आरडाओरडा करताच हे भामटे मुलीस टाकून पळून गेले.

या घटनेची तक्रार बेतले नगर भागात राहणा-या वृध्देने पोलिस स्थानकात दिली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकच्या साल्हेरसह १२ किल्ले 'युनेस्को'च्या जागतिक वारसा स्थळ यादीत !

या तक्रारीवरुन सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरूवारी घरातील किचनमध्ये वृध्दा काम करीत असतांना ही घटना घडली. वृध्देची चार वर्षीय नात युविका घरातील हॉल मध्ये झोपलेली होती. यावेळी दरवाजा उघडा असल्याची संधी साधून एका अनोळखी इसमाने घरात प्रवेश करून मुलीस उचलून घेत पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मुलीस खांद्यावर घेवून सदर इसम घराबाहेर पडताच त्यास शेजारी राहणा-या महिलेने विचारपूस केल्याने ही बाब उघडकीस आली. विचारपूस करीत असतांना सदर इसमाने दुर्लक्ष केल्याने महिलेने आरडाओरड केली असता संशयिताने मुलीस खाली सोडून पोबारा केला. याबाबत पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक भटू पाटील करीत आहेत.
नाशिक: ‘या’ कारणामुळे फ्री फायर गेम खेळता खेळता नांदेडचा मुलगा पोहोचला नाशिकला …
नाशिक: “माझे फोन रिसिव्ह का करीत नाहीस? ”म्हणत जुन्या मित्राने केला विवाहितेचा विनयभंग

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790