Breaking: नाशिकला देवाणघेवाणीच्या वादातून इंदिरानगर बोगद्याजवळ गोळीबार…

नाशिक: देवाणघेवाणीच्या वादातून इंदिरानगर बोगद्याजवळ गावठी कट्ट्यातून गोळीबार…

नाशिक (प्रतिनिधी): देवाणघेवाणीच्या वादातून नाशिकच्या इंदिरानगर बोगदा परिसरात मित्राकडूनच जीवे ठार मारण्याची धमकी देत गोळीबार केल्याची घटना घडली आहे..

हा प्रकार बुधवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडला.. आणि गुरुवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मुंबई नाका पोलिसांत तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

फिर्यादी अविनाश टिळे याने त्याचा मित्र सुनील चोरमारे याला काही दिवसांपूर्वी 2 लाख रुपये उसने दिले होते. त्यांनतर 31 डिसेंबरच्या दिवशी टिळे याने सुनीलकडून 3 दिवसांसाठी त्याकडील स्विफ्ट कार वापरण्यासाठी घेतली होती.

हे ही वाचा:  नाशिक: प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी

मात्र काही कारणास्तव अविनाश टिळे याला स्विफ्ट कार ही सुनील याला देणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे बुधवारी दि. ४ जानेवारी रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास अविनाश हा त्याच्या चौघा मित्रांसोबत सुनील चोरमारे याला स्विफ्ट कार देण्यासाठी इंदिरानगर बोगदा परिसरात आला होता.. त्यावेळी संशयित सुनील चोरमारे, जग्गू सांगळे, राज जोशी हे त्या ठिकाणी आले. या दरम्यान बाचाबाची झाल्यानंतर सुनील याने त्याच्या खिशातून देशी बनावटीच्या पिस्तूल मधून हवेत गोळीबार केला.

हे ही वाचा:  नाशिक: स्टॉक ट्रेडिंगच्या बहाण्याने दाम्पत्याने केली दोन लाखांची फसवणूक

त्याचप्रमाणे जीवे ठार मारण्याची धमकी देत अविनाशच्या दिशेने पुन्हा गोळीबार करण्यासाठी बंदूक रोखली मात्र बंदुकीतून गोळी फायर झाली नाही. यावेळी घाबरलेल्या अविनाश आणि त्याच्या मित्रांनी तेथून पळ काढत पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी घटना स्थळी येऊन पंचनामा केला असून, संशयित सुनील चोरमारे, जग्गू सांगळे, राज जोशी यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ००५/२०२३, भारतीय दंड विधान: ३०७, ५०४, ५०६, ३४, मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम १३५, भारतीय हत्यार कायदा कलम: ३, २८) तीनही संशयित हे फरार असून मुंबई नाका पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790