Jobs in Nashik: Require Telecaller (Female) in Nashik. Click Here For More Details.
नाशिक (प्रतिनिधी): कपडे विक्री करणार्या दुकानाच्या गल्ल्यात बळजबरीने हात टाकून 1200 रुपये चोरून नेणार्या चोरट्यास उपनगर पोलिसांनी दोन तासांत अटक केली आहे.
याबाबत माहिती अशी, की पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या प्रकरणाच्या चौकशीची सूचना केली होती.
या गुन्ह्यातील आरोपी सचिन ऊर्फ घोड्या मधुकर तोरवणे हा फिर्यादी मिराज मन्सूर खान यांच्या कपड्यांच्या दुकानात कपडे पाहण्याच्या बहाण्याने आला.
त्याने दुकानमालक खान यांना चापटीने मारहाण करून “तुम मुझे पहचानते नही, मुझे घोड्या भाई बोलते है,” असे म्हणून दुकानाच्या गल्ल्यात हात टाकून 1200 रुपये काढून घेऊन निघून गेला होता.
- नाशिक: महिलेच्या मानगुटीवर बिबट्याचा हल्ला; मैत्रिणीने दगडमाती फेकत वाचवले..
- महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागात बुधवारी (दि. २३ फेब्रुवारी) पाणीपुरवठा नाही
दरम्यान या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीलेश माईनकर यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक ए. बी. पाटील, गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक लखन, कॉन्स्टेबल गवळी, कर्पे व गोगरे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन ऊर्फ घोड्या मधुकर तोरवणे याचा गुन्हा घडल्यानंतर दोन तासांत शिताफीने शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याने बळजबरीने चोरलेल्या रकमेपैकी 930 रुपये जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील करीत आहेत.