नाशिक: महिलेच्या मानगुटीवर बिबट्याचा हल्ला; मैत्रिणीने दगडमाती फेकत वाचवले..

Jobs in Nashik: Require Telecaller (Female) in Nashik. Click Here For More Details.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-मुंबई महामार्गावरील पाडळी देशमुख (ता. इगतपुरी) येथील पुलाजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला चढवला.

यात ती महिला गंभीर जखमी झाली आहे.

तिच्या सोबत असलेल्या दुसऱ्या महिलेने प्रसंगावधान राखत प्रतिकार केल्यानंतर बिबट्याने धूम ठोकली.

मुंबई- आग्रा महामार्गावरील पाडळी देशमुख येथील गोदामाजवळ सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास नाशकातील एका महिलेच्या मानगुटीवर बिबट्याने हल्ला चढवला. यावेळी सोबत असलेल्या मैत्रिणीने बिबट्यावर दगड व मातीचा मारा केल्याने त्याने धूम ठोकली. जखमी महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नाशिक येथील सुरेखा अशोक विभुते (वय ३०) व शांताबाई शिवाजी रेपूकर (४०, दोघीही रा. म्हाडा घरकुल, मुंबई नाका, नाशिक) या पहाटे भंगार गोळा करण्यासाठी पाडळी शिवारात गेल्या होत्या. पुलाखालील प्लास्टिक घेण्यासाठी सुरेखा गेल्या असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला.

सोबत असलेल्या शांताबाई यांनी बिबट्याचा प्रतिकार करत मैत्रिणीचा जीव वाचवला. वर्दळीच्या महामार्गावर बिबट्याचा महिलेवर हल्ला झाल्याने पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीज धामच्या रुग्णवाहिकेचे निवृत्ती गुंड यांना या घटनेबाबत समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी महिलेला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates