नाशिक त्र्यंबक रोडवर विचित्र अपघातात ट्रकच्या क्लीनरचा जागीच मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक त्र्यंबक रोडवर विचित्र अपघातात ट्रकच्या क्लीनरचा मृत्यू झाला आहे.
त्र्यंबक रोडवरील महिरावणीजवळ बुधवारी (दि. ८ जून) दुपारी हा अपघात घडला.
नाशिक त्र्यंबकरोड वरील महिरवणी गावाजवळ एक विचित्र अपघात गाडीतून पडून त्याच गाडीतील क्लीनरचा पुढील टायर खाली येऊन जागीच मृत्यू झाला आहे.
त्र्यंबककडून नाशिककडे जाताना एक विचित्र अपघात घडला आहे. सुर्यकांत राघो बागुल वय ३५, राहणार एकलहरा असे मृताचे नाव आहे. या अपघाताला एक तास उलटूनही कुठल्याही प्रकारचे रुग्णवाहिका आली नव्हती. त्यामुळे त्यांचा मृतदेह महिरावणी ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत टाकून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्याठिकाणी बघ्यांची देखील मोठी गर्दी जमली होती. पोलिस तातडीने दाखल झाले असून अधिक तपास चालू आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: लाईट कट करण्याचे सांगत ३ लाख ९८ हजारांना घातला गंडा..पोलिसांनी पैसे परत मिळवून दिले
नाशिक हादरलं! आधी पत्नीचा गळा चिरला, नंतर पतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या