नाशिक: ग्राहकांनो थकीत वीजबिल भरा अन्यथा पुरवठा खंडित करण्याचे आदेश…
नाशिक (प्रतिनिधी): अखंडित वीजसेवा देत असल्याने महावितरणची आर्थिक घडी विस्कटली असून अन्य कोणताही पर्याय नसल्याने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून नागरिकांनी सहकार्य करावे.
अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याचे सक्त निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.
नाशिक येथील महापारेषणच्या सभागृहात नाशिक व मालेगाव मंडळातील कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते यांची सोमवारी (दि. २३) आढावा बैठक झाली.
- नाशिक: पत्नी नांदायला येत नसल्याने जावयाकडून सासूचा खून
- धक्कादायक: निमाणी बस स्टॅन्डवर सिटी लिंक बसमध्ये बसलेल्या महिलेचा विनयभंग
यावेळी मुख्य अभियंता दिपक कुमठेकर, नाशिक मंडलाचे अधिक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, मालेगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता रमेश सानप उपस्थित होते. दुसरीकडे महावितरणच्या वीजग्राहकांकडे थकबाकीचा मोठा डोंगर आहे. या गंभीर आर्थिक संकटामुळे महावितरणच्या अस्तित्वाचा सध्या बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. मोबाईल, डिश टी.व्ही., विजेवरील उपकरणे यांच्या बिलाचा ठराविक वेळेत भरणा केला जातो.
मात्र मुलभूत गरज असलेल्या विजेचे बील भरण्यास ग्राहकांकडून फारसे प्राधान्य दिले जात नाही असे डांगे या बैठकीत म्हणाले. यावेळी नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी सुद्धा नाशिक व मालेगाव मंडळाचा आढावा घेऊन या महिन्यात वीज देयक वसुलीसह ग्राहकसेवा आणखी गतिमानतेने करण्याचे आवाहन केले.
महावितरणवर करोडोचे दायित्त्व:
ग्राहकांना अचूक, योग्य व वेळेत वीजबील देण्यासाठी मीटर एजन्सी नेमण्यात आल्या आहे. त्यांना मीटर वाचन करुन अचूक काम करण्यास सांगितले आहे, त्यांचीही कार्यक्षमता न सुधारल्यास मीटर रिडींग एजन्सींवर कारवाई करण्याचे आदेश दिले अाहेत. ना नफा, ना तोटा या तत्वाने वीजसेवा देणाऱ्या महावितरणवर एक ग्राहक म्हणून वीजखरेदी, पारेषण खर्च तसेच विविध कर्ज व त्याच्या हप्त्यांचे सद्यस्थितीत करोडो रुपयांचे दायित्त्व आहे. – चंद्रकांत डांगे, सहव्यवस्थापकीय संचालक, कोकण प्रादेशिक विभाग