Live Updates: Operation Sindoor

नाशिक: खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस तब्बल नऊ वर्षानंतर अटक; क्राईम ब्रांच युनिट २ चं यश !

नाशिक: खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस तब्बल नऊ वर्षानंतर अटक; क्राईम ब्रांच युनिट २ ची कामगिरी

नाशिक (प्रतिनिधी): तब्बल नऊ वर्षांपूर्वी 4 मार्च 2013 रोजी मेहबूब नगर वडाळा येथे एकाचा खून करून फरार झालेल्या उत्तरप्रदेशच्या आरोपीस अटक करणे, गुन्हे शाखा युनिट 2 च्या पथकाला यश आले.

👉 हे ही वाचा:  महावितरणच्या नाशिक मंडळ अधिक्षक अभियंतापदी राजेश थूल रुजू

याबाबत माहिती अशी की, अज्ञात आरोपींनी अब्दुल सलाम मुस्तफा चौधरी नावाचे इसमास गळा आवळून ठार केले व रूमला बाहेरून कुलुप लावून आरोपी फरार झाले, अशी तक्रार इंदिरानगर पोलीस स्टेशनला दाखल झाली होती.

तेव्हापासून आरोपी नामे मंगरू उर्फ अब्दुल मन्नान चौधरी(मूळ रा. रामपूर अरुणा, पोस्ट सादुल्ला नगर, जिल्हा बलरामपुर, उत्तर प्रदेश) हा साथीदारांसह फरार झाला होता.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दोन दुचाकीचोर सात दुचाकींसह जाळ्यात

गेल्या 2 ऑगस्ट रोजी पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना सदर आरोपी हा मुंबई येथे वास्तव्यास असल्याचे समजले.

त्यावरून वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, पोलीस हवालदार नंदू नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पालखेडे यांचे पथक मुंबईकडे रवाना झाले. तपासाअंती नवी मुंबई येथील रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घनसोली परिसरातून आरोपी मंगरू चौधरी यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी इंदिरा नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखेच्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी पथकाचे अभिनंदन केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790