नाशिक: अल्पवयीन मुलांनी रस्त्यांवर वाहन चालविल्यास पालकांवर होणार कारवाई

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: अल्पवयीन मुलांनी रस्त्यांवर वाहन चालविल्यास पालकांवर होणार कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलांकडून रस्त्यांवर वाहने चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे १८ वर्षाखालील मुलांना विनापरवाना वाहन चालविण्यास पालकांनी परवानगी देवू नये, अन्यथा पालकांना शिक्षा व दंडात्मक करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

मोटार वाहन कायद्यांतर्गत १६ वर्षाखालील मुलांनी वाहन चालविण्याचा गुन्हा केला. गुन्ह्यामध्ये दोषी आढळणाऱ्या मुलांच्या पालकांना तीन वर्ष कारावास व २५ हजार रूपये दंडाची तरतुद करण्यात आली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाची थोडी उसंत; घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी 'यलो अलर्ट' जारी

त्याचप्रमाणे वाहन चालविण्याचा परवाना नसतांना वाहन चालविल्यास चालकास रूपये ५ हजार व वाहन मालकास ५ हजार असा एकूण १० हजार रूपये दंड व शिक्षेची तरतुद मोटर वाहन कायद्यात करण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने याबाबत वायुवेग पथकामार्फत जिल्हा व शहरात जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलिस असल्याची केली बतावणी करत वृद्धेचे ३.७० लाखांचे दागिने लांबवले

१८ वर्षाखालील मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसल्यामुळे त्यांना वाहन चालविण्याची परवानगी देण्यात येवू नये, असे प्रबोधन प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयात जाऊन करीत आहेत. तरी पालकांनी याची गांर्भीयाने दखल घ्यावी, असे आवाहनही प्रदिप शिंदे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790