नाशिकमध्ये वीजपुरवठा होतोय वारंवार खंडित, लोडशेडिंग सुरु झालंय का ? जाणून घ्या…

नाशिकमध्ये वीजपुरवठा होतोय वारंवार खंडित, लोडशेडिंग सुरु झालंय का ? जाणून घ्या…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील अनेक भागात काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होतोय.

त्यामुळे नाशिकमध्ये लोडशेडिंग सुरु झालंय का असा प्रश्न प्रत्येकाला पडतोय.

याबाबत महावितरणने खुलासा केला आहे.

दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व आगमनाअगोदर विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्ये केली जातात.

यामध्ये विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह नियोजन करून इतर महत्वाची  कामे केली जातात जेणेकरून पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. नाशिक परिमंडलात ही कामे  गतीने सुरू असून जवळपास ५० टक्के पेक्षा जास्त कामे पूर्ण झाली आहेत.

त्यामुळे ग्राहकांची  तात्पुरती गैरसोय होत असली तरी पावसाळ्यामध्ये  ग्राहकांना अखंडीत वीज मिळावी म्हणूनच ही कामे केली जातात. तरी ग्राहकांनी संयम राखून या काळात सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विद्युत यंत्रणांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करायचे असल्यास  सदर कार्य  करण्यासाठी त्या भागातील वीजपुरवठा खंडित करावाच लागतो. त्यामध्ये सर्व भागच वा विद्युत वाहिनी खंडित न करता टप्प्याटप्प्याने कामे करून  तेवढाच भाग खंडित करून त्या भागातील दुरुस्ती कामे केली जातात.

हे ही वाचा:  SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81 टक्के; इथे पहा निकाल…

ही कामे पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन जास्त वेळ बंद राहू नये म्हणून उंच वाढत असलेल्या  झाडाच्या फांद्या  विद्युत यंत्रणेला  स्पर्श करीत असेल तर  त्या फांद्या तोडणे, फुटलेले पीन आणि इंसुलेटर बदलणे,  तपासणी व दुरुस्त करणे, रोहीत्रांचे ऑईल तपासणी, ऑइल गळती थांबवणे,वाहिनींचे खराब झालेले लाईटनिंग अरेस्टर बदली करणे, भूमिगत वाहनांचे तात्पुरती असलेले जॉईट कायमस्वरूपी करणे, वाहिन्यांचे खराब झालेले जंपर बदली,जीर्ण झालेल्या वायर बदल, जळालेल्या तुटलेल्या वायर बदलणे,  उपकेंद्रातील सर्व यांत्रिक बाबीची व यंत्रणा यांची तपासणी करणे व त्याची दुरुस्ती करणे तसेच प्रत्यक्ष वेळेवर आढळणाऱ्या त्रुटी दीर करून  अशा प्रकारची अनेक कामे गतीने केली जातात. मात्र सदर कामे  गतीने करीत असताना काही काळासाठी वीजपुरवठा खंडित केला जातो. 

हे ही वाचा:  नाशिक: हायवा डंपर चोरणाऱ्या आरोपीस मध्यप्रदेशातून अटक

 महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सर्व अभियंते व कर्मचारी यांना विद्युत सुरक्षितता बाळगून ही कामे योग्य ती काळजी घेऊन गतीने करण्याबाबत निर्देशित केले आहे. त्यानुषंगाने ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा म्हणून हे पावसाळ्यामध्ये यंत्रणा ठप्प न होता अखंडीत पुरवठा व्हावा आणि त्यामुळे ग्राहकांना  अखंडित सेवा मिळावी म्हणून ही कामे करत असतात. सोबतच ही कामे  करण्याअगोदर ग्राहकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे सुद्धा यासंदर्भात पूर्वसूचना दिली जाते आणि ही कामे  योग्य प्रमाणात विभाजन करून त्या प्रकारे एक एक भाग बंद  करून ही कामे केली जातात.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये चार दिवस पावसाचा अंदाज; विदर्भ, जळगावला उष्णतेची लाट...

ही कामे केल्यानंतर सुद्धा अनेक वेळा जोरदार वादळी वारा व पावसामुळे झाडे, फांद्या पडून तारेवरील  डिक्स इंसुलेटर वर आकाशातील वीज पडून यंत्रणेचे नुकसान होत असते त्यामुळे त्यानंतरसुद्धा महावितरणची  यंत्रणा  पूर्ववत व  सुरळीत करण्यासाठी कार्य केल्या जाते. मात्र अगोदर प्रतिबंधात्मक उपाययोजना  केल्यामुळे  गतीने वीज पुरवठा सुरळीत करण्यास मदत होते. वाढत्या तापमानामूळे ग्राहकांना विजेअभावी होणाऱ्या त्रासाची महावितरणला जाणीव आहे.  देखभाल दुरुस्तीची  कामे वीज यंत्रणेच्या हिताची तसेच अखंडित, सुरळीत व सुरक्षित ग्राहक सेवेसाठी असून तरी ग्राहकांनी या काळात थोडासा संयम राखून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group