
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकची थंड हवेचं शहर म्हणून ओळख आहे.
मात्र गेल्या काही वर्षात दर उन्हाळ्यात तापमानाची पातळी वाढत आहे.
यावर्षी सुद्धा गेल्यावर्षीपेक्षा जास्त उकाडा जाणवत आहे.
नाशिककरांना इतक्या तापमानाची सवय नाही.
गेल्या काही दिवसांपासून तापमानात थोडी फार का होईना पण सातत्याने वाढ होत आहे. आज (दि. २७ एप्रिल) ला तापमानाने उच्चांक गाठला आहे. आज ४१.० इतके कमाल तापमान नोंदवले गेले. त्यामुळे आता नागरिकांनी आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. पुढील 5 दिवसांत पूर्व, मध्य आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची स्थिती दिसणार आहे. यामुळे पुढील 5 दिवसांत विदर्भ, राजस्थान आणि मध्य प्रदेश; तर 27-30 एप्रिल दरम्यान उत्तर प्रदेश, झारखंड, अंतर्गत गंगा पश्चिम बंगाल आणि ओडिशात उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) दिला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: ‘ह्या’ कारणामुळे बहिणीकडून सख्ख्या भावाचा खून
धक्कादायक: एका विहिरीत दीर- भावजयीचा तर दुसरीमध्ये तरुणाचा मृतदेह
नाशिकरोड सेन्ट्रल जेलमध्ये कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न