नाशिकच्या पंचवटी भाजी मार्केटमध्ये व्यापार्‍यावर प्राणघातक हल्‍ला

नाशिकच्या पंचवटी भाजी मार्केटमध्ये व्यापार्‍यावर प्राणघातक हल्‍ला

नाशिक (प्रतिनिधी): विचारलेली माहिती न दिल्याचा राग आल्याने तीन जणांनी एका व्यापार्‍यासह दोन जणांवर विळ्याने वार करून प्राणघातक हल्‍ला केल्याची घटना भाजी मार्केट येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी उमेश चंद्रकांत गाडे (रा. आरटीओ कॉर्नर, नाशिक) यांचे पंचवटी भाजी मार्केट येथे अंबिका व्हेजिटेबल कंपनी नावाचे दुकान आहे.

हे ही वाचा:  नाशिक सिटीझन्स फोरमतर्फे आज (दि. २६) संवादसत्र

या दुकानातील जगदीश भल्‍ला याच्याशी असलेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून, तसेच भल्‍लाबाबत विचारलेली माहिती गाडे यांनी दिली नाही म्हणून संशयित आरोपी सिद्धार्थ चंद्रकांत जाधव, प्रवीण जनार्दन जाधव व राहुल निरभवणे (तिघांचीही माहिती उपलब्ध नाही) हे कंपनीच्या केबिनमध्ये हातात विळा घेऊन आले.

तिघा आरोपींनी वाईटसाईट शिवीगाळ करून कंपनीमधील केबिनच्या काचा, संगणक, प्रिंटर व एसीची तोडफोड करून नुकसान केले.

हे ही वाचा:  नाशिक: "घटस्फोट पाहिजे असेल तर ५३ लाख रुपये द्या"; सासरच्या मंडळींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल...

तसेच सिद्धार्थ जाधव याने हातातील विळ्याने गाडे यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने दुखापत करून डोक्यावर वार करीत असताना मंगेश लहामगे याने गाडे यांना वाचविण्यासाठी उजवा हात मध्ये घातल्याने त्याच्या पंजालाही विळ्याचा वार झाला असून, पंजा जखमी झाला आहे, तसेच या हाणामारीच्या घटनेत कंपनीच्या केबिनमध्ये असलेली 1 लाख 13 हजार रुपयांची रोकडही गहाळ झाली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: रेल्वे अपघात घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला अटक..

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात सिद्धार्थ जाधव, प्रवीण जाधव व राहुल निरभवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रवीण जाधव याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डंबाळे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790