नाशिकच्या तरुणाने Money Heist स्टाइलने केरळमध्ये बँकेतून लुटलं साडेतीन कोटीचं सोनं!

नाशिकच्या तरुणाने Money Heist स्टाइलने केरळमध्ये बँकेतून लुटलं साडेतीन कोटीचं सोनं!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या एका तरुणाने साताऱ्यातील तीन पहिलवानांच्या मदतीने केरळातील एका बँकेवर दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपींनी केरळातील बँकेतून तब्बल साडेतीन कोटींचं सोनं लुटलं होतं. केरळ पोलीस तपास करत असताना, या दरोड्याचे धागेदोरे नाशिक आणि साताऱ्यापर्यंत येऊन पोहोचले होते. याप्रकरणी केरळ आणि सातारा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

तर नाशकातील निक ऊर्फ निखिल जोशी हा या दरोड्याच्या घटनेतील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. अलीकडेच सातारा पोलिसांनी मुख्य आरोपी जोशीसह तीन पहिलवानांना अटक केली होती. मुख्य आरोपी जोशी हा मुळचा नाशिक येथील रहिवासी असून त्याने साताऱ्यातील तीन पहिलवानांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”8198,8219,8193″]

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी केरळातील एका बँकेवर काही अज्ञातांनी दरोडा टाकला होता. चोरट्यांनी अत्यंत नियोजनपूर्व पद्धतीनं दरोडा टाकत बँकेतील साडेतीन कोटी रुपयाचं सोनं लुटलं होतं. या प्रकरणी केरळात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना, याचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा इथपर्यंत पोहोचले आहेत.

केरळ पोलिसांनी संशियत आरोपींचा माग काढत सातारा पोलिसांच्या मदतीने एका हॉटेलातून चार जणांना अटक केली आहे. निखिल जोशी असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव असून तो नाशकातील रहिवासी आहे. तर सचिन शेलार, नवनाथ पाटील, अतुल धनवे असं अटक केलेल्या अन्य दरोडेखोरांची नावं आहेत. संबंधित सर्व आरोपी साताऱ्यातील रहिवासी आहे. संशयित आरोपींना आता केरळ पोलिसांच्या ताब्यात दिलं असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

असा आला प्रकार उघडकीस:
बँक उघडण्यासाठी कर्मचारी आले तेव्हा घरफोडी उघडकीस आली. स्ट्राँग रूम गॅस कटरने उघडी पडली होती आणि सोने आणि पैसे गायब असल्याचे आढळून आले. बँक सुरुवातीला घरफोडीच्या तारखेची पुष्टी करू शकली नाही कारण बँक तीन दिवस बंद होती. आरोपींनी अलार्मचे नुकसान केले आणि सीसीटीव्हीच्या तारा कापल्या. त्याने हार्ड डिस्क काढली होती आणि बँकेचे वीज कनेक्शनही कापले होते. त्याने बॅटरीवर चालणारे ड्रिलर आणि हायड्रोलिक कटरचा वापर करून स्ट्रॉंग रूम उघडली.

नंतर, केएसईबी रेकॉर्डच्या मदतीने रात्री 9.30 ते रात्री 10 दरम्यान वीज खंडित झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी आरोपींची ओळख पटवण्यासाठी जवळच्या संस्था आणि लॉजमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तो एका इनोव्हा कारमध्ये आला होता आणि एका महिन्यापेक्षा जास्त काळ विविध लॉजवर राहिला होता. महाराष्ट्रात पळून जात असताना त्याने वाल्यार येथे कार सोडली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group