धक्कादायक: सावकाराच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षीय युवकाची आत्महत्या
नाशिक (प्रतिनिधी): खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून ३० वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दहा हजार रुपयांच्या वसुलीसाठी सावकाराने तगादा लावल्याने या जाचाला कंटाळून सातपूर येथील भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या निलेश बाळासाहेब सोनवणे (३०) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि.१७) घडली.
या प्रकरणी मृताच्या भावाने मंगळवारी तक्रार दिल्याने सातपूर पोलिस ठाण्यात निखिल भावले याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, निलेशला पैशांची गरज असल्याने त्याने संशयित भावलेकडून १० हजार रुपये उसनेवार घेतले होते. भावले याने १० हजार रुपये वसुलीसाठी निलेशकडे तगादा लावला होता. त्यातून निलेश ताणतणावात असायचा.
घटनेनंतर सावकार फरार झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूर परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा नीलेश आपल्या आई-वडील व लहान भावासोबत अशोकनगर परिसरात राहत होता. सोमवारी त्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मोठा मित्र परिवार असलेल्या नीलेशने सावकाराकडून जादा व्याजाने १० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम वसूल करण्यासाठी सावकाराने त्याची दुचाकी ओढून नेली होती. या सर्व कारणांमुळे नीलेश नैराश्यात गेला होता व त्यातूनच त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहरात या दिवशी पाणीपुरवठा नाही
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १८ जानेवारी २०२२) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू