देवळाली कॅम्प परिसरातील विहितगाव येथे बिबट्या जेरबंद !

नाशिक (प्रतिनिधी) : देवळाली कॅम्पमधील विहितगाव परिसरातील मळे भागात वनविभाकडून १० ते १२ दिवसांपासून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अखेर एक प्रौढ बिबट्या जेरबंद झाला आहे. यामुळे बिबट्याच्या भीतीने जीव मुठीत धरून असलेल्या परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

विहितगाव परिसरात बिबट्याला अनेक लोकांनी पहिले होते. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. नागरिकांच्या मागणीवरून वनकर्मचाऱ्यांनी परिसरात पिंजरा लावला होता. अनेक दिवस बिबट्या या भागात येऊन फिरून जात होता. मात्र, सोमवारी (दि.२३) रोजी पहाटे बिबट्या या पिंजऱ्यात प्रवेश करताच जेरबंद झाला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group