नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकरोड परिसरातल्या देवी चौक सराफ बाजार येथे एका महिला ग्राहकाच्या पर्समधून चांदीचा मुकुट चोरी झाल्याची घटना घडली होती. हा मुकुट दोन महिला चोरट्यांनी चोरला होता. त्यांचा शोध घेत नागरिकांनी दोघा महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नाशिकरोड परिसरातल्या शेगावकर ज्वेलर्स मध्ये दुपारी दोन वाजेच्या सुमारास एका महिलेने २६ ग्राम वजनाचा चांदीचा मुकुट खरेदी केला होता. त्या दुकानातून निघून गेल्यानंतर काही वेळाने पुन्हा येऊन मुकुताबाबत विचारपूस करत होत्या. त्यावेळी दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात फुटेज पहिली असता सदर महिला पणती खरेदी करत असतांना दोन महिला पाठीमागून आल्या. आणि पर्समध्ये हात टाकून चांदीच्या मुकुटाचा बॉक्स काढून घेतल्याचे लक्षात आले. परिसरातील काही व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी त्या महिला चोरांचा शोध घेतला असता त्या सापडल्या. त्यानंतर या महिलांना नाशिकरोड पोलीसांच्या ताब्यात दिले.