नाशिक (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जुने नाशिकमधून मुख्य मिरवणूक तर, नाशिक रोड आणि अंबड परिसरातही जल्लोषात मिरवणूक काढण्यात येते.
मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडीची शक्यता असल्याने मिरवणूक मार्गांवर वाहतूक वळविली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्यासंदर्भात अधिसूचना वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी जारी केली आहे.
दरम्यान, मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी करडी नजर असणार आहे. शुक्रवारी (ता. १४) मुख्य मिरवणूक मार्गांवर वाहतुकीला प्रवेश बंदी असणार आहे.
नाशिक: घर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणत नसल्याने विवाहितेचा छळ
याचप्रमाणे, नाशिक रोड आणि अंबड परिसरातील पाथर्डी फाटा या तीनही ठिकाणी मिरवणूक मार्ग दुपारी बारापासून ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असतील. त्यामुळे या परिसरातील वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त बच्छाव यांनी केले आहे.
नाशिक: अवैध विदेशी मद्यासह हॉटेल मालकाला अटक; फियाट कारसह मद्यसाठा जप्त
मुख्य मिरवणूक मार्ग:
राजवाडा (भद्रकाली) – वाकडी बारव – महात्मा फुले मार्केट – भद्रकाली मार्केट – बादशाही कॉर्नर – गाडगे महाराज पुतळा – मेनरोड – धुमाळ पॉइंट – सांगली बँक – नेहरू गार्डन – देवी मंदिर शालिमार – शिवाजी रोड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (समारोप)
पर्यायी मार्ग :
चौक मंडईकडून वाहने सारडा सर्कलमार्गे जातील. फुले मार्केट ते अमरधाम, टाळकुटेश्वर मंदिर ते पंचवटीकडे वाहने जातील.
दिंडोरी नाका, मालेगाव स्टॅन्ड, रविवार कारंजा, सांगली बँक मार्गे शालिमार, सीबीएसकडे जाणाऱ्या बस, अन्य वाहने दिंडोरी नाक्यावरून पेठ फाटा, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल मार्गे सिडको, नाशिक रोडकडे जातील-येतील.
नाशिक रोड मिरवणूक मार्ग:
बिटको चौक – क्वॉलिटी स्वीट – मित्रमेळा ऑफिससमोर – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – देवी चौक – जव्हार मार्केट – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (समारोप)
प्रवेश बंद मार्ग :
उड्डाणपुलावरून खाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारा मार्ग. – दत्तमंदिराकडून बिटको सिग्नलकडून येणारा मार्ग – रेल्वे स्टेशनकडून बिटकोकडे येणारा मार्ग.
पर्यायी मार्ग :
सिन्नर फाट्याकडून पुलाखालून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बिटको चौक, रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहतूक सिन्नर फाटा येथून उड्डाणपुलावरून दत्त मंदिर चौक, दत्त मंदिर रोडने सुराणा हॉस्पिटल, सत्कार टी पॉइंट – रिपोर्ट कॉर्नर येथून रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन येथून सुभाष रोड मार्गे परत दत्त मंदिर सिग्नल मार्गे जातील-येतील.
नाशिककडून पुण्याकडे जाणारी वाहतूक दत्तमंदिर सिग्नलवरून वीर सावरकर पुलावरून सिन्नर फाट्याकडे जातील-येतील.
नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरातील बस दत्तमंदिर सिग्नलमार्गे सुभाष रोडवरून जातील. सीबीएसकडे येणारी वाहने नाशिकरोड न्यायालयासमोरून सरळ आर्टिलरी रोडमार्गे जयभवानी चौकातून उजवीकडे वळून उपनगर सिग्नलमार्गे पुढे जातील.
पाथर्डी फाटा प्रवेश बंद मार्ग:
गरवारे पॉइंट ते पाथर्डी फाटा, पाथर्डी सर्कल, कलानगर, फेम सिग्नल रस्त्यावर दोन्ही बाजूने, तसेच पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा मार्गे डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरून अंबड-सातपूर लिंक रोडवर अवजड वाहनांना मनाई. तर, नम्रता पेट्रोल पंप ते पाथर्डी फाटा रस्त्यावर दोन्ही बाजूने सर्व वाहनांना मनाई असेल.
पर्यायी मार्ग :
गरवारे पॉइंट पूर्वीच्या ओव्हर ब्रीजमार्गे द्वारका, फेम सिग्नल ते द्वारकावरुन ओव्हर ब्रीजमार्गे गरवारे, पाथर्डी गाव ते सातपूर-अंबडकडे जाण्यासाठी राणेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून मार्गस्थ. तसेच अंबडकडून येणारी वाहने पोलिस स्टेशन मार्गे महामार्गावर येतील.
ही वाहने असतील अपवाद:
मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद असले तरीही पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना सदरील आदेश लागू नाही