नाशिक (प्रतिनिधी): नूतन बिटको रुग्णालयात पाच दिवसांपासून कोरोनाबाधिताचे प्रे’त कुजत पडल्याचा आरोप सत्यभामा गाडेकर यांनी केला. सिंहस्थ निधीतून खरेदी केलेल्या सिटी स्कॅन, एमआरआय मशीन सुरू नाही. बिटको रुग्णालयाच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असून त्यामागे कोरोना नियंत्रण प्रमुख डॉ. आवेश पलोड असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गाडेकर यांनी केली.
चर्चेअंती डॉ. पलोड यांना कोरोना नियंत्रण प्रमुख पदावरून हटवून सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी केल्यानंतर यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षकांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा करावी, असे आदेश सभापती गिते यांनी दिले. रुग्णालयातील लेखापरीक्षकांवर लक्ष ठेवण्यासाठी समिती खासगी रुग्णालयांच्या अवाजवी बिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाने नियुक्त केलेले लेखापरीक्षकच रुग्णांच्या आर्थिक लुटीत रुग्णालय प्रशासनाबरोबर वाटेकरी झाल्याचा गंभीर आरोप सलीम शेख यांनी केला.
त्यानंतर सरकारी तसेच खासगी रुग्णालयांना हाेणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याचे ऑडिट तसेच खासगी रुग्णालयात नेमण्यात आलेल्या लेखापरीक्षकांवर नजर ठेवण्यासाठीदेखील अधिकारी व नगरसेवकांची समिती गठित करण्याचे अादेश सभापती गिते यांनी दिले.