जिल्ह्यात आज पर्यंत ६८ हजार ०४५ रुग्ण कोरोनामुक्त ; ८ हजार ९५९ रुग्णांवर उपचार सुरू….

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (दि.०३ ऑक्टोबर) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६८ हजार ०४५  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ८  हजार ९५९ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १ हजार ४१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ६४४, चांदवड १५३, सिन्नर ७६४, दिंडोरी २५३, निफाड १०३२, देवळा १७६,  नांदगांव २७४, येवला १००, त्र्यंबकेश्वर १५३, सुरगाणा ३२, पेठ २५, कळवण १५५,  बागलाण २३९, इगतपुरी २५१, मालेगांव ग्रामीण ३०६  असे एकूण ४  हजार २३४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ८८० मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४०९  तर जिल्ह्याबाहेरील ११३ असे एकूण ८  हजार ९५९   रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ७८  हजार ४१४  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७६.२१,  टक्के, नाशिक शहरात ९१.२६ टक्के, मालेगाव मध्ये  ८५.०३ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७२.३९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.७८  इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ४७३, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ७५० मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १५७  व जिल्हा बाहेरील ३० अशा एकूण १ हजार ४१० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

(वरील आकडेवारी आज (०३. ऑक्टोबर) सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790