जिल्ह्यात आजपर्यंत 10 हजार 280 रुग्ण कोरोनामुक्त; 2 हजार 499 रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १० हजार २८० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत २ हजार ४९९ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ४८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक १४९, चांदवड ५१, सिन्नर १०१, दिंडोरी ४९, निफाड ११९, देवळा ६९,  नांदगांव ६७, येवला २५, त्र्यंबकेश्वर १५, सुरगाणा १६, पेठ ०३, कळवण ०२,  बागलाण २४, इगतपुरी ९८, मालेगांव ग्रामीण ३५ असे एकूण  ८२३ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ५८५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ८९  तर जिल्ह्याबाहेरील ०२  असे एकूण २ हजार ४९९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  १३  हजार २६३ रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: मित्रांसोबत गावतळ्यात पोहायला गेला, पाण्याचा अंदाज न आल्याने मुलाचा बुडून करुण अंत

कोरोनामुळे आजपर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ११३, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  २६७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४  व जिल्हा बाहेरील २० अशा एकूण ४८४  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790