नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (दि.१२) सकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३९ हजार ७९८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ९ हजार ९२७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत १०३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५०६, चांदवड १४५, सिन्नर ५०३, दिंडोरी
१०४, निफाड ७३२, देवळा ८९, नांदगांव ३९९, येवला ७९, त्र्यंबकेश्वर ५४, सुरगाणा ००, पेठ ०८, कळवण २४, बागलाण ३३१, इगतपुरी १२७, मालेगांव ग्रामीण ३६३ असे एकूण ३ हजार ४६४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५ हजार ८६३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५८६ तर जिल्ह्याबाहेरील १४ असे एकूण ९ हजार ९२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ५० हजार ७६० रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ६९.९५, टक्के, नाशिक शहरात ८१.५४ टक्के, मालेगाव मध्ये ७६.७४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.८० टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ७८.४० इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यु :
नाशिक ग्रामीण ३०३, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ५८४ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १२४ व जिल्हा बाहेरील २४ अशा एकूण १०३५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
(वरील आकडेवारी आज दि.१२ सप्टेंबर सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)