गर्भवती महिलांना ‘पंतप्रधान मातृ वंदना’ योजनेचा लाभ; जिल्ह्यात १५,९९५ महिलांची नोंद

नाशिक (प्रतिनिधी): गर्भवती महिलांसाठी सरकारकडून काहींना काही योजना सुरूच असतात. या योजनांचा फायदा निश्चितच त्यांना होत असतो. गरोदर महिलेच्या व बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी या योजना राबवण्यात येत असतात. यावर्षीच्या ‘पंतप्रधान मातृ वंदना’ योजनेचा जिल्ह्यातील १५,९९५ गर्भवतींना लाभ मिळाला. यामुळे माता-बाल मृत्यू दारात घट झाली आहे. या योजनेसाठी ९ कोटी ७५ लाख ६६ हजार रुपयांच्या अनुदानाचे वितरण आतापर्यंत करण्यात आले आहे यातून नाशिक जिल्ह्याला ५३,६७,२९,००० एवढी निधी देण्यात आला आहे. 

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी

 ‘पंतप्रधान मातृ वंदना’ योजनेमधून गरोदर महिलांची नियमित तपासणी व्हावी, त्यांना योग्य आहार मिळावा यासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक महिलेला पाच हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे. अनेक गर्भवती महिलांना गर्भधारणेच्या वेळी पोषक आहार न मिळाल्याने  त्यांना अशक्तपणा, मधुमेह, कमी रक्तदाबासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. गर्भवती महिलांच्या ह्या समस्या कमी व्हाव्या म्हणून सरकारकाढून हा निधी देण्यात येतो. महिला सरकारी दवाखान्यात किंवा आरोग्य केंद्रात जाऊन वेळोवेळी तपासण्यांसाठी जावू शकतात. या तपासण्या नियमित होत असल्याने गर्भवती महिलांचे आरोग्य नीट राहील.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 कोटीचा गुटखा जप्त; इगतपुरी पोलीसांची मोठी कामगिरी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790