खळबळजनक: खाणीत आढळले बेपत्ता मजुरासह मुलांचे मृतदेह

खळबळजनक: खाणीत आढळले बेपत्ता मजुरासह मुलांचे मृतदेह

नाशिक (प्रतिनिधी): बैलपाळ्याच्या दिवशी ३ वर्षीय मुलगा आणि ९ वर्षीय मुलीसह घरातून निघून गेलेल्या पित्याचा मृतदेह आज सकाळी ११ वाजता खाणीमध्ये तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शंकर गुलाब महाजन (वय ३४, तिघेही मूळ रा.यावल, ता.जि.जळगाव, हल्ली रा.ओझर, नाशिक), पृथ्वी शंकर महाजन (वय ९) व प्रगती शंकर महाजन (वय ३) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक आक्रमक, लिलाव बंद पाडून कांदा निर्यात बंदीचा निषेध

शंकर महाजन हे मोलमजुरी करतात. ते दोन्ही मुलांना सोमवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजता घरातून निघून गेले होते. ते कोठे जात आहेत, याबाबत काहीएक माहिती दिली नव्हती. आज सकाळी ११ वाजता सैय्यद पिंप्री शिवारातील खाणीमध्ये तिघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता अहिरराव यांनी भेट दिली.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
गंगापूर रोड: पुत्रप्राप्तीसाठी ५० हजार रुपये मागणाऱ्या भोंदूबाबाचा भांडाफोड
अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकासह २४ लाखांचा गुटखा जप्त
नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ८ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

हे ही वाचा:  बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिका जखमी

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790