नाशिक (प्रतिनिधी): ग्रामपंचायत ,ग्रामपालिका ,पालिका, महानगर पालिका यांनी कोरोना रुग्ण शोधले तर त्यांना शासनाकडून दिड लाख रुपये मिळतात त्यामुळे जास्त प्रमाणात रुग्ण शोधले जात आहे असा संदेश सोशल मीडियावर पसरवला जातोय… एखादा कोरोना रुग्ण शोधला म्हणून सरकार कोणत्याही स्थनिक स्वराज्य संस्थेला पैसे देत नाही अशी स्पष्टोक्ती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. तो संदेश पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आहे, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.
शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत त्या संबंधित रुग्ण रुग्णलयात उपचार घेत असल्यास त्या उपचाराचे पैसे थेट त्या रुग्णलयाला मिळतात. त्या बद्दल कोणत्याच अधिकाऱ्याला किंवा स्थनिक स्वराज्य संस्थेला पैसे मिळत नाहीत. महात्मा फुले जन आरोग्य योजना हि रुग्ण शोधण्याची योजना नाही असे जिल्ह्धिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले . त्या योजनेविषयीची माहिती शासनाच्या वेबसाईटवर उपलबध आहे. अशा प्रकारचे जर काही संदेश पसरत असतील तर ते केवळ अफवा आहेत असे जिल्ह्धिकारी मांढरे यांनी स्पष्ट केले .