
कसारा घाटात अपघात: क्रुझवरील नियंत्रण सुटले, एक बालिका ठार तर ७ जखमी
नाशिक (प्रतिनिधी): कसारा घाटात क्रुझ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक बालिका ठार तर ७ जण जखमी झाले आहेत.
आज (दि. ११ मे) मुंबई लेनवर नवीन कसारा घाटात धबधबा पॉईंटच्या वळणावर पहाटेच्या सुमारास क्रुझरचा हा अपघात झाला.
एमएच 22 यु 2801 या क्रमांकाचे हे वाहन भरधाव वेगात जात असतांना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
त्यामुळे वाहन पलटी होऊन रोडच्या बाजूला असलेल्या संरक्षण भिंतीला जोरात आदळले.
- नाशिक: रिक्षातील प्रवासाचा बहाणा करत लुटणाऱ्या दोन महिलांना अटक!
- नाशिक: लहान भावाच्या पत्नीचा मोठ्या भावाकडून विनयभंग
- सातपूरला चार चाकी व दोन मोटारसायकल यांच्यात तिहेरी अपघात; एक युवक ठार
या अपघातात दर्शना विजय कांबळे वय ११ वर्ष रा. मंठा जि. जालना ही मुलगी ठार झाली तर ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या अपघातात लिहीलाबाई लिंबाजी राठोड वय ३०, लिंबाजी राठोड वय ४० दोघे रा. मालेगाव, विठ्ठल चव्हाण वय ४५, जयश्री गजानन पवार वय ३४, अन्वी गजानन पवार वय ०१, कल्पना राजेश जाधव वय ३०, शामराव चव्हाण वय ६० सर्व रा. वसई हे जखमी झाले आहेत. रूट पेट्रोलिंग टीमने मयत व जखमींना टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र नंतर अपघातग्रस्त वाहन बाजूला करून दोन्हीकडची वाहतूक सुरळीत करण्यात आली.