ऑक्सिजन व औषधांची साठेबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार : जिल्हाधिकारी

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्ह्यात ऑक्सिजनची साठेबाजी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि तसे काही घडल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करावा. तसेच सर्व रुग्णालयांना पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी भरारी पथक नेमून तपासण्या कराव्यात. अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील कोविड-19 रुग्णांसाठी आज रोजी दररोज 3 हजार 801 ऑक्सिजनच्या  जम्बो सिलिंडरची मागणी असून जिल्ह्यातील आजचा पुरवठा हा 5 हजार 571 जम्बो सिलेंडर इतका आहे. याबाबतची माहिती संबंधित महापालिका व नगरपालिका यांचेकडून संकलित केली असल्याचे यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा हा आज रोजी रुग्णालयांना पुरेसा असून रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरविणाऱ्या स्टॉकिस्ट कडेही वारंवार तपासणी करून अहवाल सादर करणेबाबत जिल्हाधिकारी मांढरे यांनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन माधुरी पवार यांना सूचना दिल्या असून त्यांच्या मदतीसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वाहनही अधिग्रहीत करून पुरवण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी दिल्या आहेत.

तसेच ज्या ठिकाणी सदर औषधाचा काळाबाजार झाल्याचे निदर्शनास येईल त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याबाबत सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिल्या आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790