नाशिक (प्रतिनिधी) : इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअँप या सोशल साईटवरून मैत्री करून भेटवस्तू पाठवलेले पार्सल सोडून घेण्यासाठी सांगून महिलेला ३ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
महिलेने दिलेल्या तक्रारीवरून इंस्टाग्रामच्या माध्यमातून डॉ.अँथोनी विलियम नावाच्या व्यक्तीने तो ब्रिटन येथील रहिवाशी असल्याचे सांगून मैत्री केली. त्यानंतर सदर व्यक्तीने पाठवलेली वस्तू ब्रिटिश पाउंड लीग मधून सोडवण्यासाठी पैसे भरावे लागतील असे सांगितले. त्यानंतर तो व्यक्ती कायदेशीर बाबतीत अडकल्याचे खोटे सांगून सोडवण्यासाठी महिलेकडून वेगवेगळ्या बँक खात्यावरून ३ लाख ८ हजार ९९९ रुपयांची रक्कम भरून घेतली. पैसे घेतल्यानंतर महिलेसोबत विलीयामने संपर्क टाळला.
फोटोच्या माध्यमातून बदनामी :
मॉडेलिंग करण्याच्या दृष्टीकोनातून मॉडेलींगसाठी लागणारे फोटो इंस्टाग्रामवर प्रसारित करणे एका महिला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी पीडितेने सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यन्वे गुन्हा नोंदवला आहे. सदर पीडितेने दिलेल्या तक्रारींवरून तिने तिचे फोटो मॉडेलिंग साठी इंस्टाग्रामवर प्रसारित केले होते. दोन संशयितांनी हे फोटो घेऊन त्या मध्ये फेरफार करून विकृत बदल करून ते फोटो दुसऱ्या बनावट इंस्टाग्राम अकाउंटवर प्रसारित केले.