आठवडे बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य प्राधिकरणाला पाठवणार- जिल्हाधिकारी मांढरे
नाशिक (प्रतिनिधी): आठवडे बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य प्राधिकरणाला पाठवणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी असलेले विविध निर्बंध हटविण्यात आले असून जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार सुरू करण्याचा प्रस्ताव राज्या आपत्ती नियंत्रण प्राधिकरणास लगेच आजच पाठवून त्यास मान्यता घेतली जाईल असे सांगून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.
नवरात्रोतसवाच्या कालावधीत मंदिर परिसरात गर्दिच्या ठिकाणी लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात येणार असून आठवडे बाजार सुरू झाल्यानंतर तेथेही अशा प्रकारची मोहिम सुरू करण्यात येणार असून लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदविल्यास जिल्ह्यातील लसीकणची टक्केवारी वाढून तिसऱ्या लाटेपासून जिल्ह्याचा बचाव करण्यासाठी शासन-प्रशासनास मदत होईल.
यावेळी झालेल्या चर्चेत आमदार नरेंद्र दराडे, डॉ. राहुल आहेर, देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, सुहास कांदे, हिरामण खोसकर यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी सहभाग घेवून विविध सूचना यावेळी केल्या.