आजपासून आंतरजिल्हा बसेस सुरु; जाणून घ्या वेळापत्रक

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या पाच महिन्यांपासून एसटी महामंडळाची आंतरजिल्हा सेवा अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्यात आली होती. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

आजपासून एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्याटप्याने सुरु झाल्या असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी इ – पासची आवश्यकता नसून प्रवासात प्रवाशांनी शासनाने घालून दिलेल्या कोविड – १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक केले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भारतननगर झोपडपट्टी परिसरात आग; ५ जखमी

असे आहे वेळापत्रक :

नाशिक-धुळे –        नवीन सी.बी.एस –    सकाळी ६.००, ८.००, १०.००, १२.००, २.००

नाशिक-पुणे –        नवीन सी.बी.एस –    सकाळी ६.००, ७.००, ८.००, ९.००, १०.००

नाशिक-औरंगाबाद –   नवीन सी.बी.एस. –    सकाळी ८.००, १०.००, १२.००

नाशिक-नंदुरबार –     जुने सी.बी.एस –            सकाळी ८.००, १०.००

नाशिक-त्र्यंबक –            जुने सी.बी.एस –            सकाळी ८.००, १०.००

हे ही वाचा:  नाशिक: श्री स्वामी समर्थांच्या पादुका २९ पासून शहरात; ३० एप्रिलला मेनरोड येथून मिरवणूक !

नाशिक-बोरीवली –     महामार्ग बसस्थानक – सकाळी ७.००, ९.००

नशिक-कसारा –      महामार्ग बसस्थानक – सकाळी ६.००, ८.००, १०.००

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790