Live Updates: Operation Sindoor

अशा प्रकारे नोकरीचे आमिष दाखून घातला १५ लाख रुपयांचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी): एअर इंडिया सेटस ग्राउंड स्टाफ मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखून २६ बेरोजगारांना १५ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. नोकरीचे आमिष दाखून नोकरी न लावून देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सुमंत कोलांती उर्फ बॉबी कोलांती (रा. एलंखा ओल्ड टाऊन व्यंकटालामूर्तीनगर २४ कास) व रघवेंद्र नीलाया(रा. बेंगरूळ कर्नाटक) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनगर परिसरातील सद्गुरू रेसिडेन्सी मध्ये राहणारे सुप्रिया पंकज दुबे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्या नुसार त्या दिल्ली येथे नोकरी करत असताना मैत्रीण स्टेला हिच्यामार्फत कोलांती याच्यासोबत ओळख झाली. कोलांती हा एअर इंडिया सेट्स ग्राउंड स्टाफ म्हणून कामाला होता. त्याने मी अनेकांना नोकरी लावली आहे असे सांगितले. मार्च २०१८ मध्ये एअर इंडिया मध्ये नोकरी साठी जागा असून एव्हिएशन अकॅडमी मार्फत तुमचे काम होईल आणखी कोणी नोकरी साठी इच्छुक असेल त्यांचे देखील काम होईल असे सांगून कोलांती ने विश्वास संपादन केला. त्यानंतर  मे २०१८ मध्ये  ऑनलाईन पेटीमद्वारे पाच हजार रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन तसेच प्रोसेसिंग फी म्हणून २५ हजार रुपये घेतले त्यानंतर सुप्रिया दुबे यांनी दोन लाख ३० हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले आणि दुबे यांचा मित्र सुशांत हा मुंबईत कन्सल्टन्सी व्यवसाय करतो, त्याच्याकडील १८ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ५० हजार रुपये असे एकूण नऊ लाख रुपये कोलांती याच्या खात्यात जमा केले. त्याचप्रमाणे दुबे यांची दिल्लीतील मैत्रीण मोनिका हि सेलिबीनाज एअरपोर्टयेथे मेनेजर असून तिने हि सात बेरोजगार विद्यार्थ्यांचे साडेतीन लाख रुपये दुबे याच्या खात्यात जमा केले. त्यानंतर दुबे यांनी ती रक्कम कोलांतीच्या खात्यावर पाठवली. त्यांनतर कोलांतीने ऑगस्ट १८ मध्ये तुमचे काम होईल असे सांगितले, मात्र तेव्हा काम झाले नाही. मग डिसेंबरमध्ये काम होईल असे सांगितले तेव्हाही काम झाले नाही. फ़ेब्रुवारी २०१९ मध्ये काम होईल असे आश्वासन दिले त्यानंतर कोलांतीचे सगळे मोबाईल क्रमांक बंद आल्याने त्याच्या कडून फसवणूक झाल्याची खात्री झाली.

Loading

👉 हे ही वाचा:  नाशिक शहर पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन: ८० गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती; ४२ ताब्यात

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790