🚩 कुंभमेळा बातम्या | 🚦Traffic Updates

महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत मंगळवारी (दि. ५ जुलै) पाणीपुरवठा नाही

महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत मंगळवारी (दि. ५ जुलै) पाणीपुरवठा नाही

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे.

नाशिक शहरात मंगळवारी (दि. ५ जुलै २०२२) काही भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे कळविण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: णमोकार तीर्थाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश- मंत्री छगन भुजबळ

कल्पतरु नगर जलकुंभावरील 500 मिमी रायझिंग मेनचा व्हॉल नादुरुस्त झाल्याने सदर व्हॉल बदलणे गरजेचे आहे.

त्यामुळे नाशिक पुर्व भागातील प्र.क्र. 23 मधील रॉयल कॉलनी राजा कॉलनी रेहनूमा नगर जय हिंद कॉलनी ममतानगर कल्पतरू नगर मातोश्री कॉलनी आदित्य नगर गणेश बाबा नगर व अशोका मार्ग इत्यादि परिसरात मंगळवार दिनांक 05/07/2022 रोजी सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही व बुधवार दि.06/07/2022 रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. तरी सदर भागातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790