चामर लेणी परिसरात पिस्तूलचा धाक दाखवून तिघांना लुटले

नाशिक (प्रतिनिधी): चामर लेणी परिसरात फिरण्यास गेलेल्या तिघांना पिस्तूलचा धाक दाखवत लुटण्याची घटना रविवारी (दि. २) घडली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ब्रिज अक्षय शहा (रा. विजयनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी दुपारी चारच्या सुमारास चामर लेणींच्या पायथ्याशी तीन मित्रांसह फिरण्यास गेले होते. तेथे चार अनोळखी व्यक्ती जवळ आल्या. यापैकी दोघांनी पिस्तूलचा धाक दाखवत शहा व त्यांच्या तीन मित्रांनी जिवे मारण्याची धमकी देत मोबाइल फोन, कॅमेरा, सोन्याची चेन, अंगठी व ब्रेसलेट्स असा २ लाख ६६ हजारांचा ऐवज लुटून नेला. शहा यांनी याबाबत पोलिसांना कळवताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पथक दाखल झाले. तोपर्यंत संशयित फरार झाले होते.