ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे यांचे कोरोनाशी लढा देतांना निधन..

नाशिक (प्रतिनिधी): येथील ज्येष्ठ पत्रकार विवेक देशपांडे यांचे बुधवारी (दि. ७ एप्रिल) कोरोनाशी लढा देताना निधन झाले. महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप तसेच नाशिक कॉलिंगचे संस्थापक- संपादक मंदार देशपांडे यांचे ते वडील. मुळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले विवेक देशपांडे यांनी दीर्घ काळ एमएसइबी मध्ये नोकरी केली तसेच वयाच्या १६ व्या वर्षापासून मुक्त पत्रकारितेला सुरुवातही केली होती. दैनिक लोकशाही, तरुण भारत, दैनिक देशोन्नती, दैनिक लोकमत याशिवाय अनेक मोठ्या दैनिकांमध्ये दीर्घकाळ राजकीय व सामाजिक विषयावर स्तंभ लेखन केले. मात्र ज्येष्ठ पत्रकार असल्याचा मोठेपणा त्यांनी कधी मिरवला नाही… कथाकथनमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.