अत्यावश्यक सोयी-सुविधांच्या पासेससाठी “या” ठिकाणी अर्ज करा !

नाशिक (प्रतिनिधी): अत्यावश्यक सोयी पुरवतांना अनेकांना अडचण येत आहेत. पण आता लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यातील १५ प्रकारच्या अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा-सुविधांना परवानगी देण्यात आली आहे. या सेवा-सुविधांमधील उद्योग आस्थापनांनी आपल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या ई-पासेससाठी जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://nashik.gov.in वरील ‘कोविड-१९’ (Covid-19) या पोर्टलवर रितसर ऑनलाईन अर्ज करावेत, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.

लॉकडाउऊनच्या कालावधीत खालील अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यास शासनाने जिल्हा प्रशासनास कळविले आहे. त्यात,

  • सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा
  • शेती व त्यासंबंधीत उपक्रम व सेवा
  • वित्तीय सेवा
  • सामाजिक स्वरूपाच्या सेवा
  • ऑनलाईन व डिस्टन्स एज्युकेशन
  • मनरेगाची कामे
  • सार्वजनिक उपयोगितेची कामे
  • राज्यांतर्ग व बाहेर मालवाहतुक
  • जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा
  • वाणिज्य व खाजगी आस्थापना
  • सरकारी व खाजगी उद्योग
  • अनुज्ञेय बांधकामे
  • आपत्कालीन वाहतुक
  • भारत सरकारची व अधिनस्त, स्वायत्त व दुय्यम कार्यालये
  • राज्य शासनाची स्वायत्त तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये

या १५ प्रकारच्या सेवा-सुविधांचा समावेश आहे. सुरू ठेवण्यास त्यासाठी लागणारा आ-पास  देण्यासाठी https://nashik.gov.in/ यावर सोय करण्यात आली असून संबंधीत यंत्रणांनी या संकतस्थळाला भेट देवून ऑनलाईन अर्ज सादर करावेत. या सर्व अर्जांची रितसर ऑनलाईन पडताळणी करून ई-पास वितरित केले जातील असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.