नाशिक शहरात शुक्रवारी (दि. १९ मार्च) या भागात पाणीपुरवठा नाही

नाशिक शहरातील काही भागात शुक्रवारी पाणीपुरवठा होणार नसल्याचे नाशिक महानगरपालिकेने कळविले आहे.

नाशिक (प्रतिनिधी): गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्रास पुरवठा करणारी मुख्य पीएससी (सिंमेट) 1200 मी.मी.व्यासाची  रॉ-वॉटर पाईप लाईन गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक, मनोहर नगर समोरील गांधीनगरकडे जाणारी पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने सदर काम तातडीने हाती घ्यावयाचे आहे.

तसेच कालिका जलकुंभ येथील गुरुत्ववाहीनीची गळती थांबविणेकरीता आवश्यक ते काम करावे लागणार असल्याने तसेच तदअनुशंगिक कामे करावी लागणार असल्याने शुक्रवार दि. 19/03/2021 रोजी  सकाळचा, दुपारचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा खालील भागात होऊ शकणार नाही. तसेच दि.20/03/2021 रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, तरी याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे, ही विनंती.

नाशिक पुर्व मधील प्रभाग क्र. 14 भागश:, 15 भागश:,23 भागश:, 30 भागश: प्र.क्र. 16 पुर्ण

नाशिक पश्चिम मधील प्रभाग क्र. 7, 12 व 13 मधील संपुर्ण भाग

पंचवटी विभागातील प्रभाग क्र. 1,2,3,4,5 व 6 मधील संपुर्ण भाग

नाशिक रोड विभागातील प्रभाग क्र. 17, 18, 19, 20, 21 व 22

नविन नाशिक विभाग प्रभाग क्र. 25 भागश:, 26 भागश: व 28 भागश:

सातपुर विभाग प्रभाग क्र.   08, 9, 10,11,26 पुर्ण  27 चुंचाळे व दत्त नगर परिसर

तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.