नाशिक शहरात 13, ग्रामीण भागात 3 आणि मालेगाव मध्ये 21 नवीन पॉझिटीव्ह रुग्ण

नाशिक(प्रतिनिधी): आज (दि. 8 मे 2020) प्राप्त झालेल्या एकूण 420 अह्वालांपैकी 380 अहवाल निगेटिव्ह तर 38 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात दोन अहवाल दुबार चाचणीमध्ये पॉझिटीव्ह आले आहेत. नाशिक शहरातील 13, विंचूर येथील 2 , दिंडोरी येथील 1, आणि मालेगाव येथील 21 तर जिल्ह्याबाहेरील एक अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज आलेले हे अहवाल नाशिक शहरासाठीही चिंताजनक आहेत.

नाशिक शहरातील पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये सातपूर कॉलनी येथील 48 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय पुरुष, सातपूर येथील 2 वर्षाची चिमुरडी, हिरावाडी येथील 43 वर्षीय महिला, मालपाणी साफरोन येथील 65 वर्षीय महिला, सातपूर कॉलनीतील 51 वर्षीय पुरुष, श्रीक्रीष्णा नगर येथील 26 वर्षीय महिला, सातपूरच्या एमएचव्ही कॉलनीतील  20 वर्षीय युवक, नवीन सिडको येथील 40 वर्षीय पुरुष आणि पाटील नगर येथील 40 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. यातील बहुतांश रुग्ण हे याआधी आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांचे निकाटवर्तीय असल्याचे समजते.

नाशिक ग्रामीण भागातील पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये सिद्धार्थ नगर, विंचूर येथील 37 वर्षीय महिला, विंचूर येथील 19 वर्षीय युवक आणि दिंडोरी येथील 43 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

तर इतर 21 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये मालेगावच्या रुग्णांचा समावेश आहे. आणि एक पॉझिटीव्ह जिल्ह्याच्या बाहेरील आहे.