जिल्ह्यात आजपर्यंत 22 हजार 043 रुग्ण कोरोनामुक्त; 4 हजार 03 रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील २२ हजार ०४३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ०३ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ३४८ ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत ७२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक २३०, चांदवड ४४ , सिन्नर २४१, दिंडोरी ४१, निफाड ३१९, देवळा ७३,  नांदगांव १२२, येवला १६, त्र्यंबकेश्वर २२, सुरगाणा १२, पेठ ०२, कळवण १८,  बागलाण ८८, इगतपुरी ५५, मालेगांव ग्रामीण १२८ असे एकूण  १४११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ०५६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६३०  तर जिल्ह्याबाहेरील ०६ असे एकूण ४ हजार ०३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  २६  हजार ७७४  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७५.०४,  टक्के, नाशिक शहरात ८४.८७ टक्के, मालेगाव मध्ये  ६५.५३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.४८  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.३३ इतके आहे.

कोरोनामुळे आजपर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण १९६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ४१२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९८ व जिल्हा बाहेरील २२ अशा एकूण ७२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू

(वरील आकडेवारी आज दि. २० ऑगस्ट) सकाळी ११.००  वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)