महत्वाचे: नाशिक शहरातील दुकानांच्या वेळेत बदल

नाशिक(प्रतिनिधी): शहरातील दुकानं उघडी ठेवण्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. पूर्वीची वेळ ही सकाळी 10 ते 4 अशी होती. ती आता बदलून सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी करण्यात आली आहे. पूर्वीची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी होत असल्यामुळे हे बदल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. वेळ वाढली असली तरी सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कन्टेनमेंट झोन मध्ये मात्र फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु राहतील.