घंटागाडीच्या धक्क्याने तरुणीचा अपघात होऊन मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सातपूर क्लब हाऊसच्या मैदानावर नियमितपणे मॉर्निंग वॉक करत असतांना रोशनी जयस्वाल नावाच्या तरुणीचा घंटागाडीच्या धक्क्याने अपघात होऊन मृत्यू झाला.

या घटनेची फिर्याद मृत तरुणीचा मित्र उज्ज्वल डोंगरे याने सातपूर पोलिसांकडे दिल्यांनतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशनी पोलीस भरतीसाठी रोज त्या मैदानावर धावण्याचा सराव करायची. ती हा सराव साधारणपणे पहाटे ५ च्या सुमारास करायची. अशी माहिती तिच्या मित्राने पोलिसांना दिली.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

नेहमीप्रमाणे सराव झाल्यावर उज्ज्वल, रोशनी व प्रिया जयस्वाल घराकडे जात होते. एमआयडीसीच्या ग्लेनमार्क कंपनीच्या अलीकडील रस्त्याने ते जात असतांना, त्याचवेळी एका घंडागाडीचे डिझेल संपल्याने तिला दुसरी घंटागाडी बेल्ट बांधून कामगार नगर येथील पंपावर ओढून नेत होती. यावेळी पुढील घंटागाडी टोचण देत ओढत असतांना मागील घंटागाडीचा बेल्ट चाकात अडकल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्टेअरिंग लॉक झाले यामुळे झोकांड्या घेत असलेल्या घंटागाडीच्या ट्रॅक्टरच्या मागील चाकाची जोरदार धडक रोशनीला बसल्याने डोक्याला लागल्याने तिचा मृत्यू झाला. रोशनी हि कामगार नगर येथील रहिवाशी असून ती आता २२ वर्षांची होती. तिच्या पश्चात चार बहिणी व आईवडील आहेत.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; सोमेश्वर धबधब्यात पडून युवतीचा मृत्यू