पोलीस कर्मचाऱ्यास पाच हजाराची लाच घेताना अटक..

नाशिक (प्रतिनिधी): अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठया शिताफीने सापळा रचून अटक केली. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगार व्यावसायिकाला दुकान चालू ठेवण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकात असलेले संशयित हवालदार भास्कर मल्ले यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. बोलणी झाल्यानुसार गुरुवारी लाचखोर मल्ले याने तक्रारदार भंगार व्यवसायिकाकडून लाच स्विकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडून ताब्यात घेतले.        

गुरुवारी मल्ले रजेवर असताना लाच घेण्यासाठी तक्रारदार व्यापाऱ्याकडे गेले होते. लाचखोर मल्ले विरोधात अंबड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहे.