नाशिक: सायंकाळी वॉकला जाणाऱ्या 11 बेजबाबदार नागरिकांवर पोलिसांनी केली कारवाई

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर पोलिसांनी सायंकाळी परीचा बाग येथे वॉकला जाणाऱ्या 11 बेजबाबदार नागरिकांवर कलम 188 प्रमाणे कारवाई केली आहे. लॉकडाऊन सुरु असला आणि संचारबंदी लागू असली तरीही अनेक नागरिक सकाळी आणि सायंकाळी वॉकला जात आहे. नाशिक शहर पोलिसांनी अशा लोकांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान नाशिक शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 हद्दीत 11 एप्रिल ते 15 एप्रिल 2020 दरम्यान एकूण 32 जणांवर मास्क न घातल्याप्रकरणीही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तर 15 एप्रिल रोजी संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 40 जणांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.