महापालिका आयुक्त देणार नाशिककरांच्या प्रश्नांची उत्तरे

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक महानगरपालिकेतर्फे नाशिककरांशी संवाद साधण्यासाठी फेसबुक लाईव्ह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (दि.१९) सकाळी ११ वाजता हा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम सुरु होणार आहे. या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे हे नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत.

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भीती आणि विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. या अनुत्तरीत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्याक्रमामध्ये भाग घेऊन आपल्या शंकांचे निरसन करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी MyNashikMC या फेसबुकच्या पेजला भेट द्यावी.