जिल्ह्यात आजपर्यंत 40 हजार 298 रुग्ण कोरोनामुक्त; 7 हजार 282 रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ६०  हजार २९८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ७ हजार २८२ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये १ हजार १५८  ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत १ हजार २४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ४१७, चांदवड ९४, सिन्नर ५४०, दिंडोरी १४६, निफाड ८०१, देवळा ४५,  नांदगांव २२८, येवला ६०, त्र्यंबकेश्वर ६७, सुरगाणा २५, पेठ २२, कळवण ६९,  बागलाण १७१, इगतपुरी १३४, मालेगांव ग्रामीण २९६ असे एकूण ३ हजार ११५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ५१४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५४७  तर जिल्ह्याबाहेरील १०६ असे एकूण ७ हजार २८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ६८ हजार ८२९ रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ८०.५१,  टक्के, नाशिक शहरात ९१.०५ टक्के, मालेगाव मध्ये ८०.४२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६८.८४  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८७.६१ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ३९१, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ६७९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १५१  व जिल्हा बाहेरील २८ अशा एकूण १ हजार २४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी आज दि. २५ सप्टेंबर सकाळी ११.००  वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)