नाशिक: कोरोना पॉझिटिव्हचा आकडा मंगळवारी(दि. २३ मार्च) पुन्हा वाढला:१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मंगळवारी (दि. २३ मार्च) पुन्हा वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी २६४४ इतके कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर नाशिक जिल्ह्यात १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक शहर: १४८०, नाशिक ग्रामीण: ८२७, मालेगाव: २५९ तर नाशिक जिल्हा बाह्य मध्ये: ७८ इतक्या रुग्णांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये: नाशिक शहर: ६ तर नाशिक ग्रामीण मध्ये: ९ इतक्या रुग्णांचा समावेश आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक