नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १० ऑगस्ट) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु !

नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १० ऑगस्ट) इतक्या हजार रुग्णांवर उपचार सुरु !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ९३ हजार ८४५  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्यस्थितीत १ हजार ४७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २९ ने घट झाली आहे.  तसेच आत्तापर्यंत ८ हजार ५३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव वाहनाच्या धडकेत इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ठार; विद्यार्थ्यांचा रास्ता रोको...

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३०,  बागलाण ११, चांदवड २३, देवळा २४, दिंडोरी २०, इगतपुरी ०९, कळवण ०३, मालेगाव ५२, नांदगाव २०, निफाड ७१, पेठ ००, सिन्नर १०९, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ००, येवला ३७ असे एकूण ४०९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५८७ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ३८ तर जिल्ह्याबाहेरील १३  रुग्ण असून असे एकूण १ हजार ४७   रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३ हजार ४२८ रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव वाहनाच्या धडकेत इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ठार; विद्यार्थ्यांचा रास्ता रोको...

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९७.०५ टक्के, नाशिक शहरात ९८.०१ टक्के, मालेगाव मध्ये ९६.८७  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.५२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६२  इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण ४ हजार ९७  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९५६ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ५३६  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
(वरील आकडेवारी दि. १० ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव वाहनाच्या धडकेत इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ठार; विद्यार्थ्यांचा रास्ता रोको...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates